बिहारमधील नवादा जिल्ह्यात बुधवारी रात्री गुंडांनी दलित समाजातील काही नागरिकांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे. हल्लेखोरांनी गोळीबार करून सुमारे 80 घरांना आग लावली. मात्र, जवळपास 25 ते 30 घरे जळाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या गंभीर घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
...