उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये लग्नाच्या अवघ्या १२ तासांनंतर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नवरदेवाचा मृत्यू झाल्याने आनंदाचे दु:खात रूपांतर झाले. सतीश कुमार (२३) या तरुणाचा विवाह झाल्याच्या १२ तासांनंतर बरेली येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली आहे. सतीश कुमार हा त्याच्या चुलत भाऊ आणि मित्रासोबत मिठाई खरेदी करण्यासाठी गेला असता उभ्या असलेल्या ट्रकला त्यांची एसयूव्ही धडकली. यात विजेश कुमार आणि सतीश जागीच मृत्यू झाला आहे.
...