बरेली जिल्ह्यातील सिरौली भागात काल फटाका बनवणाऱ्या युनिटमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने या घटनेतील मृतांची संख्या पाच झाली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) अनुराग आर्य यांनी या घटनेत निष्काळजीपणा केल्याबद्दल चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
...