या अपघातात किमान दोन सैनिकांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. बांदीपोरा जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मसरत इकबाल वानी यांनी एएनआयला सांगितले की, रुग्णालयात 5 जखमींना आणण्यात आले होते, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला होता. 3 जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारांसाठी श्रीनगरला पाठवण्यात आले आहे.
...