आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात एका महिलेला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडल्याने तिला धक्काच बसला आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील उंडी मंडलातील येंदागंडी गावात ही भीषण घटना घडली. नागा तुलसी नावाच्या महिलेने घर बांधण्यासाठी आर्थिक मदतीसाठी क्षत्रिय सेवा समितीकडे अर्ज केला होता.
...