अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरिल एका विमानात बॉम्ब असल्याचे पत्र सापडले होते. या पत्रामुळे विमानात शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आज सकाळी आंतरराष्ट्रीय विमानात बॉम्बची धमकी देणारे पत्र सापडले, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी विमानात शोधमोहीम सुरु केली होती. शोधमोहीम केली असता सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या जेद्दाह-अहमदाबाद विमानात आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
...