आग्रा येथील कागरोळ भागातील सैया परिसरात झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी घडलेल्या या अपघातात हे चौघे एकाच मोटारसायकलवरून एका लग्न समारंभासाठी जात होते. रात्री दहाच्या सुमारास चौघेही परतत असताना कागरोळ परिसरात त्यांच्या मोटारसायकलला समोरून येणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलची जोरदार धडक बसली आणि हा भीषण अपघात घडला. भगवान दास (35), वकील (35), राम स्वरूप (28) आणि सोनू (30) अशी मृतांची नावे आहेत.
...