अनंतपूर जिल्ह्यातील चोलसमुद्रम गावातील एरीस्वामी असे अपघातात बळी गेलेल्या तरुणाचे नाव आहे. एरीस्वामी हे मेकॅनिकचे काम करायचे. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर तो अनंतपूरला राहत होता, तो रविवारी काही कामानिमित्त सिद्धरामपुरमला गेला होता. रात्री 9.30 च्या सुमारास ते घरी परतत होते. या वेळी कल्याणदुर्गकडे जाणाऱ्या कारने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडकेनंतर एरीस्वामी कारच्या वर पडले.
...