वॉर 2 हा चित्रपट येणार असल्याच्या चर्चा सध्या समोर येत आहेत. कारण 'वॉर'ची सुपरहिट टीम पुन्हा एकदा एकत्र दिसून आली आहे. नुकतेच हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, वाणी कपूर आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी 'द रोशन्स'च्या सक्सेस पार्टीला एकत्र हजेरी लावली होती. सिद्धार्थ आनंदने हा खास फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, "युगानुयुगे पुनर्मिलन! टीमवॉर". त्यानंतर चाहत्यांमध्ये 'वॉर २'ची उत्सुकता वाढली आहे.
...