अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'स्काय फोर्स'चा ट्रेलर आज, 5 जानेवारी 2025 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट भारताच्या पहिल्या आणि सर्वात धोकादायक हवाई हल्ल्याच्या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २४ जानेवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'स्काय फोर्स'मध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत वीर पहारियाही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. संदीप केवलानी आणि अभिषेक अनिल कपूर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
...