बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अभिनेत्याला आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर नितीन डांगे यांनी सैफ अली खानला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. प्राथमिक माहितीनुसार डिस्चार्ज ची कागदपत्रे तयार करण्यात आली असून आज सकाळी १० नंतर त्यांना केव्हाही डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.
...