शब्बीर नाईक दिग्दर्शित 'स्वीटी सातारकर' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चागंला प्रतिसाद मिळतोय. चित्रपटातील खटकेबाज संवाद आणि गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'तू जेव्हा थैलीत होता ना तेव्हा मी पहिलीत होते', 'साडी बघायच्या वयात हा गाडी का बघतोय.', असे मजेशीर संवाद असणाऱ्या या चित्रपटातून आगळीवेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. हा चित्रपट येत्या 28 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
...