बॉलीवूडचे अनेक जुने चित्रपट पुन्हा रिलीज केल्या जात आहेत. सनम तेरी कसम हा चित्रपट काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. छावा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतरही पुन्हा रिलीज करण्यात आलेल्या सनम तेरी कसमला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांचा सुपरहिट चित्रपट 'दिल तो पागल है' एकदा पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा आयकॉनिक रोमँटिक म्युझिकल चित्रपट 28 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या पडद्यावर पुन्हा रिलीज होणार आहे
...