दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांचा ‘शिकारा: द अनटोल्ड स्टोरी ऑफ कश्मीरी पंडित’ हा चित्रपट नुकताच सर्व सिनेमागृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर आधारित असून यात प्रेमकथा मांडण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता आदिल खान आणि अभिनेत्री सादियाने प्रमुख भूमिका साकारली आहे. मात्र, प्रदर्शनाच्या दुसऱ्याचं दिवशी 'शिकारा' हा चित्रपट पायरसीचा बळी ठरला आहे. चित्रपट प्रदर्शनानंतर लिक होण्याची ही पहिली वेळ नाही. परंतु, इंटरनेटवर हा चित्रपट विनामूल्य डाऊनलोड करण्यासाठी शोधला जात आहे.
...