राधिकाने स्वत: ती मुलाची आई आहे की मुलीची हे उघड केले नसले तरी तिची मैत्रिण सारा अफझलने अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम पोस्टवर टिप्पणी केली की, 'माय बेस्ट गर्ल्स'. राधिका आपटेने आपल्या बाळाला स्तनपान करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ती लॅपटॉपवर काम करत आहे आणि तिच्या लहान मुलीला स्तनपान करताना दिसत आहे.
...