आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे. संशयिताला छत्तीसगडच्या दुर्ग येथे रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेतले आहे. तो बिलासपूरला जात होता. त्याचे नाव आकाश कैलाश कन्नौजिया असून तो 31 वर्षांचा आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या म्हणण्यानुसार, त्याच्याकडे फास्टट्रॅक असे लिहिलेले एक बॅकपॅक देखील सापडले आहे. सैफच्या इमारतीतील आणि दादरच्या मोबाईल शॉपमधील सीसीटीव्हीमध्ये असाच एक बॅकपॅक दिसला होता.
...