⚡केंद्र सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी चॅनेलसाठी जारी केली मार्गदर्शक तत्वे; अश्लील कंटेंटवर ठेवले जात आहे बारकाईने लक्ष
By Prashant Joshi
'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने बुधवारी सोशल मीडिया चॅनेल आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी भारतीय कायदे आणि माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 अंतर्गत विहित केलेल्या नीतिमत्तेचे पालन करण्याबाबत काही तत्वे जारी केली.