सोनू सूद नुकतेच त्यांच्या चित्रपट 'फतेह'मुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट नुकताच 10 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सोनू सूद यांनी केले आहे. दरम्यान, आता अभिनेता अटक वॉरंटमुळे चर्चेत आला आहे. लुधियानाच्या न्यायदंडाधिकारी रमनप्रीत कौर यांनी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला अटक करण्यासाठी वॉरंट जारी केले आहे. सोनू सूदला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आणि वॉरंटच्या अंमलबजावणीचा अहवाल १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत न्यायालयात सादर करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.
...