Bigg Boss Marathi 2, 28 July, Episode 64 Preview: Weekend चा डाव मध्ये आज महेश मांजरेकर देणार स्पर्धकांना 'कानउघडणी' करण्याची संधी; वीणा-शिवानी मध्ये पुन्हा टशन
बिग बॉस च्या घरात आज वीकेंड च्या डावात सदस्यांना इतर सदस्यांची कानउघाडणी करण्याची संधी मिळणार आहे, यामध्ये किशोरी- रुपाली आणि वीणा- शिवानी यांच्यामध्ये पुन्हा तसं पाहायला मिळणार आहे.
बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 2) घरात प्रत्येक जण कधी जोरजोरात भांडून तर कधी हळूच शाब्दिक चिमटे काढून इतर सदस्यांची कानउघाडणी करण्याचा प्रयत्न करत असतो, घरातील सदस्यांची ही सवय किंबहुना आवड लक्षात घेत आजच्या वीकेंडच्या डावात त्यांना साजेसा असा एक टास्क खेळला जाणार आहे. या टास्कचे नावच मुळात कानउघाडणी असे असणार आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या शाळेत आज सदस्यांचा वर्ग भरला असताना हा टास्क खेळ जाणार आहे. VOOT वर दाखवण्यात आलेल्या प्रोमोमध्ये या खेळाची छोटीशी झलक पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये सुरुवातील किशोरी रूपालीला तर शिवानी वीणाला कठोर शब्दात सुनावताना दिसत आहे. पहा काय घडणार आजच्या भागात
कालच्या भागात, मांजरेकरांनी रुपालीला तू शिवानीचा गेम फॉलो करताना दिसत आहेस असं म्हंटले होते, याच वाक्याला धरून आज, किशोरी सुद्धा रुपालीची कानउघाडणी करणार आहेत. सुरुवातीला आपण मैत्रिणी होतो मग पराग आला त्यापाठोपाठ वीणा आली,मग तू त्या दोघांना फॉलो करत खेळत होतीस आता पराग निघून गेल्यावर व वीणा वेगळी झाल्यावर तू शिवानीच्या मागेपुढे करत आहेस असा आरोप किशोरी रुपालीवर लावतात.
हा प्रकार संपताच शिवानी कानउघाडणी करायला येते आणि वीणावर चांगलीच झोड घेते. तू स्वतः आधी स्वतःच्या डोक्याने खेळून बोललेल्या मतावर ठाम राहायला शिक आणि मग इतरांना बोलण्याचा सल्ला सुद्धा शिवानी वीणाला देते. या दोघींमधील वादाने तापलेले वातावरण शांत करण्यासाठी मग घरात एक हलकाफुलका गाणी ओळखण्याचा खेळ खेळाला जाणार आहे, ज्यात पुन्हा योगायोगांबे शिवानी आणि वीणाचे नाव समोर आल्याने त्यांचा एक छोटासा डान्स परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, आजच्या भागाच्या सरतेशेवटी घरातील कोण्या एका सदस्याला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे, कालच्या भागात वीणा आणि हीना मधून हीना आधीच सुरक्षित झाल्याने आता अन्य नॉमिनेटेड सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे.