Coronavirus In The world | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. दिवसेंदिवस जगातील सर्व देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ब्राझील, भारत, पाकिस्तान यासह अनेक देशांमध्ये त्यासंबंधित प्रकरणे सातत्याने वाढत आहेत आणि परिस्थिती गंभीर आहे. जगातील सर्वात जास्त कोरोनाने त्रस्त असलेल्या अमेरिकामध्ये (United States of America) एका दिवसात सर्वाधिक प्रकरणांची नोंद झाली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या आकडेवारीनुसार जगातील सर्वात सामर्थ्यवान देशात शुक्रवारी 45,242 नवीन प्रकरणे आढळली आहेत. एका दिवसात मिळालेली कोरोनाग्रस्तांची ही सर्वाधिक संख्या आहे. यामुळे देशात संक्रमित लोकांची संख्या 25 लाख 50 हजारांहून अधिक झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख 27 हजाराहून अधिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमेरिकेच्या बर्‍याच प्रांतांमध्ये कोरोना रोखण्यासाठी घातलेल्या निर्बंधामध्ये शिथिलता आणि व्यवसाय उघडल्यानंतर संक्रमणामध्ये तीव्र वाढ दिसून येत आहे. (Coronavirus Worldometer Tracker: वर्ल्डोमीटर ट्रॅकरनुसार भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येने पार केला 5 लाखांचा टप्पा)

कोरोना प्रकरणांवर नजर टाकली तर वेबसाइट 'वर्ल्डमीटर' च्या आकड्यानुसार आतापर्यंत जगभरात कोरोना संक्रमितांची संख्या 99 लाखांच्या पुढे गेली आहे, तर 4 लाख 96 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुपारी प्रांत संपूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दिले. रेस्टॉरंट्सनी त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त बसण्याची परवानगी देणार नाहीत असे बंधनकारक केले आहेत. या प्रांतात एकाच दिवसात सर्वाधिक सहा हजार संक्रमित आढळले. फ्लोरिडामधेही अधिकाऱ्यांनी बारमध्ये दारू देण्यास बंदी घातली आहे. फ्लोरिडामध्ये दिवसभरात सुमारे नऊ हजार नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे.

कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांमध्ये अमेरिका अजूनही अव्वल स्थानी आहे. आतापर्यंत अडीच लाखाहून अधिक लोकांना या व्हायरसने संक्रमित झाले, तर एक लाख 27 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. अमेरिकेच्या अलाबामा, zरिझोना, कॅलिफोर्निया, जॉर्जिया, मिसिसिप्पी, मिसुरी, नवादा, ओक्लाहोमा, दक्षिण कॅरोलिना आणि टेनेसी या शहरांमध्येही नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.