बराक ओबामा ,हिलेरी क्लिंटनच्या अमेरिकेतील राहत्या घरातून स्फोटक पदार्थ जप्त
बुधवारी सकाळी हिलरी क्लिंटन त्यापाठोपाठ काही तासात बराक ओबामा आणि CNN च्या ऑफिसमध्ये कुरियरच्या माध्यमातून स्फोटक पदार्थ पोहचली
अमेरिकचे पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या हिलेरी क्लिंटन यांच्या घरातून संशयास्पद स्फोटकं सापडली आहेत. एका कुरियरच्या माध्यमातून ही स्टोटकं त्यांच्या घरी पोहचल्याची समजलं आहे. या घटनेनंतर अमेरिकेत बराक ओबामा आणि हिलेरीच्या घराजवळ पोलिसांचा ताफा आहे तसेच त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी सारे रस्ते ब्लॉक करण्यात आले आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्रपती कार्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार अशाप्रकारच्या आतंकवादी कारवाया चिंताजनक आहेत. हिलेरी आणि बिल क्लिंटनचे मेल तपासण्यात येत आहेत. हिलरी यांच्या घरातून संशयास्पद स्फोटक जप्त करण्यात आली आहेत.
बुधवारी सकाळी बराक ओबामा आणि हिलरी यांच्या घरातील विस्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. नेमकी कोणी आणि कोणत्या हेतूने ही स्फोटक हिलरी क्लिंटन आणि बराक ओबामांच्या घरी पाठवण्यात आली आहेत ? याबाबतचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. एफबीआई, सीक्रेट सर्विस आणि वेस्टचेस्टर काउंटी यांच्या मदतीने या प्रकराणाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.