PTI Banned in Pakistan: पाकिस्तान सरकारने वाढवल्या इम्रान खानच्या अडचणी; पीटीआय पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय
माहिती मंत्री अताउल्ला तरार यांनी ही माहिती दिली आहे.
PTI Banned in Pakistan: पाकिस्तान (Pakistan) च्या तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान (Prime Minister Imran Khan) यांचा त्रास काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (Pakistan Tehreek-e-Insaf PTI) पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय येथील सरकारने घेतला आहे. माहिती मंत्री अताउल्ला तरार (Information Minister Attaullah Tarar) यांनी ही माहिती दिली आहे.
देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप -
मंत्री अताउल्ला तरार यांनी सोमवारी जाहीर केले की, फेडरल सरकारने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. माजी सत्ताधारी पक्षावर देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप होत आहे. (हेही वाचा -Imran Khan Bollywood Comeback: अभिनेता इम्रान खानचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, 'या' आगामी चित्रपटात झळकणार)
दरम्यान, 71 वर्षीय खान सध्या रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात बंद आहेत. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मंत्री तरार म्हणाले की, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) वर बंदी घालण्यासाठी पुरावे आहेत. सरकार पक्षावर कारवाई करेल. सरकारचा हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने आरक्षित जागांच्या प्रकरणी पीटीआयला आणि अवैध विवाह प्रकरणात खानला दिलासा दिला आहे. (हेही वाचा - Imran Khan यांना Islamabad High Court चा दिलासा; Toshakhana case मधील शिक्षेला स्थगिती)
पीटीआयच्या उमेदवारांनी 8 फेब्रुवारीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती आणि त्यांना मतदानापासून रोखण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी निर्णय दिला की, पक्ष संसदेत 20 पेक्षा जास्त अतिरिक्त आरक्षित जागांसाठी पात्र आहे. ज्यामुळे, देशातील कमकुवत आघाडी सरकारवर दबाव वाढला आहे. राखीव जागा देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर नियोजित बंदीचा काय परिणाम होईल हे लगेच स्पष्ट झाले नाही.