
Typhoon Yagi Devastates Vietnam: यागी वादळाने व्हिएतनाम, चीन आणि फिलिपीन्समध्येही हाहाःकार माजवला आहे. फू थो प्रांतात फाँग चाऊ पुलाचा भाग कोसळल्यानंतर अनेक वाहनं पूराच्या पाण्यात वाहून गेली. तेथे वारे ताशी 250 किमी वेगाने वाहत आहेत. वादळाचा जोर कमी झाल्यानंतर अनेक भागांमध्ये जोरदार अतिवृष्टी झाली. 7 सप्टेंबरला यागी वादळ(Typhoon Yagi) व्हिएतनामला धडकल्यापासून या वादळामुळे आत्तापर्यंत 146 जणांचा मृत्यू झाला आहे. मासेमारी करण्यासाठी गेलेली जहाजं बेपत्ता झाली आहे. त्यामुळं शेकडो लोक नाहीसे झाले आहेत. वादळामुळे अनेक भागात शाळा बंद करण्यात आल्या होत्या. गेल्या तीन दिवसात हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. (हेही वाचा:Typhoon Yagi Video: चीनमध्ये निसर्ग कोपला! यागी विशानकारी वादळामुळे अनेक इमारतींचे नुकसान; 4 नागरिकांचा मृत्यू )
व्हिएतनामच्या उत्तरेकडील भागात आलेल्या पूर आणि भूस्खलनात मंगळवारी 82 जणांचा मृत्यू झाला. तर या घटनेतील 64 जण बेपत्ता आहेत, असे तेथील परशासकीय संस्थांकडून सांगण्यात आले. काओ बँग या पर्वतीय प्रांताला सर्वाधिक नुकसान झाले असून तेथे 19 जणांचा मृत्यू झाला, 36 बेपत्ता आहेत, अशी माहिती शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली आहे.
मृतांमध्ये लाओ काई प्रांतातील 19, येन बाई प्रांतातील 22 आणि क्वांग निन्ह प्रांतातील नऊ जणांचा समावेश आहे. इतर मृत्यू राजधानी हनोई, है फोंग सिटी, होआ बिन्ह, है डुओंग, लँग सोन, तुयेन क्वांग, हा गिआंग आणि लाई चाऊ प्रांतातील आहेत. शक्तिशाली वाऱ्यांसह यागी वादळामुळे 48,337 घरांचे नुकसान झाले. नॅशनल सेंटर फॉर हायड्रो-मेटीऑलॉजिकल फोरकास्टिंगने जारी केलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील प्रदेशात मंगळवारी आणि बुधवारी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे, अनेक नद्या धोकादायकच्या पातळीपर्यंत पोहोच्या आहेत.