Sri Lankan President Anura Dissanayake To Visit India: श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा दिसानायके 15 डिसेंबरपासून भारत दौऱ्यावर; काय आहे अजेंडा? वाचा सविस्तर
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके 15 डिसेंबर रोजी 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
Sri Lankan President Anura Dissanayake To Visit India: श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके (Anura Dissanayake) रविवारी भारत दौऱ्यावर येत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके 15 डिसेंबर रोजी 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, श्रीलंकेत नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपती आणि संसदीय निवडणुकांनंतर राष्ट्रपती दिसानायके यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. राष्ट्रपती दिसानायके दिल्लीतील एका व्यावसायिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. (हेही वाचा -US Immigrants Deportation Plan: अमेरिकेतून 18 हजार भारतीयांना परत पाठवले जाणार; बहुतांश लोक गुजरात, पंजाब आणि आंध्र प्रदेशातील)
दिसानायके देणार बोधगयालाही भेट -
नवी दिल्लीच्या भेटीदरम्यान राष्ट्रपती दिसानायके राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतील. ते पीएम मोदींसोबत द्विपक्षीय, प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. याशिवाय, भारत दौऱ्यात ते बोधगयालाही भेट देणार आहेत. राष्ट्रपती दिसानायके यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशांमधील बहुआयामी आणि परस्पर फायदेशीर सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. (हेही वाचा -UK: युकेच्या University of Buckingham च्या कुलगुरूंचे हैदराबादच्या तरुणीशी अफेअर; पत्नीने उघड केले गुपित, आरोपांनंतर निलंबित)
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) आपल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीलंका हा हिंदी महासागर क्षेत्रात भारताचा सर्वात जवळचा सागरी शेजारी आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या 'सागर' (SAGAR, Security and Growth for All in the Region) चा एक भाग आहे. श्रीलंकाला भारताच्या 'नेबरहुड फर्स्ट' धोरणाच्या अंतर्गत महत्त्वाचे स्थान आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोलंबो दौऱ्यात राष्ट्रपती दिसानायके यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत आणि श्रीलंकेच्या लोकांच्या फायद्यासाठी सहकार्य वाढवण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यात आली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)