Sexual Harassment: टेस्लाचे सीईओ Elon Musk यांनी फेटाळले लैंगिक छळाचे आरोप; जाणून घ्या काय आहे प्रकरण
तेव्हा लंडनला जाणार्या फ्लाइटमध्ये मस्कने अयोग्यरीत्या तिच्या पायाला स्पर्श केला. इतकेच नाही तर महिलेच्या म्हणण्यानुसार, मस्कने तिला मसाज देण्यास सांगितले
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क (Elon Musk) यांच्यावर एका एअर होस्टेसने लैंगिक छळाचा (Sexual Harassment) आरोप केला आहे. एअर होस्टेसने म्हटले आहे की, 2016 मध्ये एका फ्लाइट दरम्यान एलोन मस्क कपड्यांशिवाय तिच्यासमोर आले आणि स्वतःचे प्रायव्हेट पार्ट दाखवले. तसेच हे प्रकरण मिटवण्यासाठी महिलेला दोन कोटी रुपयेही देण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र आता मस्क यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.
काय आहे आरोप?
महिलेने सांगितले की, 2016 मध्ये ती एका खासगी जेटमध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होती. तेव्हा लंडनला जाणार्या फ्लाइटमध्ये मस्कने अयोग्यरीत्या तिच्या पायाला स्पर्श केला. इतकेच नाही तर महिलेच्या म्हणण्यानुसार, मस्कने तिला मसाज देण्यास सांगितले आणि त्या बदल्यात तिला घोडा भेट देण्याचे मान्य केले, कारण त्या महिलेला घोडेस्वारीची आवड होती. महिलेने कंपनीच्या वरिष्ठांवरही तिला मसाज देण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे.
बिझनेस इनसाइडरच्या अहवालात म्हटले आहे की, 'स्पेसएक्स' कंपनीने 2018 मध्ये या महिलेला 250,000 डॉलर दिले आणि त्या बदल्यात दावा दाखल न करण्यास सांगितले. त्यानंतर फ्लाइट अटेंडंटने लगेचच घडलेल्या घटनेची आपल्या मित्राला दिली.’ आता याच मित्राने बिझनेस इनसाइडरला ही घटना कथन केली. हा अहवाल सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर, एलोन मस्क यांनी गुरुवारी उशिरा हे दावे पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आणि त्याचा निषेध केला. (हेही वाचा: ट्विटर डील होल्डवर आहे, एलोन मस्क यांची माहिती)
एलोन मस्क यांनी ट्विट केले की, 'मी या खोट्या दाव्याला आव्हान देतो. ज्यांनी मला हे कृत्य करताना पाहिले आहे, त्यांनी माझ्या शरीरावरील एखादा टॅटू किंवा एखादे चिन्ह सांगावे ज्याबद्दल लोकांना माहिती नाही. हे लोक ते करू शकणार नाहीत, कारण तसे काही घडलेच नाही.’