University Of Oxford (Photo Credit: Twitter)

गेल्या वर्षभर संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) मुळासकट नायनाट करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिकांनी यशस्वी अशी लस बनवली. मात्र ही लस बनवून हा कोरोना आटोक्यात येतो न येतो तोच नव्या स्ट्रेनने (New Strain) जगभरात धुमाकूळ घातला आहे. तसेच या वर्षात स्ट्रेनचे आणखी नवनवे प्रकार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता कुठलाही स्ट्रेन येवो मात्र आपण लवकरात लवकर हा यावरही यशस्वी लस बनवणार असा विश्वास ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. लोकमतने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर यशस्वी लस बनविण्यासाठी वैज्ञानिकांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. अनेक देशांमध्ये स्ट्रेनने हाहाकार माजविला असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी वैज्ञानिक या लसीवर काम करत आहे.हेदेखील वाचा- पाकिस्तान कडून रशियाची कोरोनावरील Sputnik लसीच्या आपत्कालीन वापराला मंजूरी

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची नवी लस स्ट्रेनवरही परिणामकारक आहे. मात्र त्याच्या प्रभावामध्ये फरक पडला तर, प्रयोगशाळेत सेल कल्चरद्वारे या लसीमध्ये एका दिवसात बदल करता येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यानंतर ही नवीन लस नवा कोरोना संपविण्याचे काम करेल. या लसीच्या परीक्षणाचे निकाल फेब्रुवारीच्या मध्यावर येतील अशी माहिती मुख्य संशोधक साराह गिलबर्ट यांनी दिली आहे.

संशोधक पुढे म्हणाले की, या नवीन लसीमध्ये भविष्यात स्ट्रेनचे नवनवीन प्रकार आले तर त्यानुसार यात बदल करण्यात येतील. जरी लसीमध्ये बदल झाले तरीही त्याच्या उत्पादनात आणि वितरणार कोणताही फरक पडणार नाही याची काळजी घेण्यात येईल असेही सांगण्यात येत आहे.

तसेच नवा स्ट्रेन शरीरातील प्रतिरोधकांना धोका पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे केवळ नवा स्ट्रेनसाठी लसीकरण थांबवून चालणार नाही. कोरोना लसीकरणाचे काम हे अविरत सुरु राहिले पाहिजे असेही त्यांनी सांगितले आहे.