
अॅडल्ट फिल्म स्टार थाना फील्ड हिचे वयाच्या 24 व्या वर्षी निधन (Adult Film Star Thania Fields Dies) झाले आहे. ही पेरुव्हीयन पॉर्नस्टार (Peruvian Adult Film Star) आपल्या राहत्या घरी संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आली. धक्कादायक म्हणजे पॉर्न इंडस्ट्रीमध्ये तिच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा तिने आरोप केला होता. ज्यामुळे ती चर्चेत आली होती. हे आरोप केल्यानंत अवघ्या एका महिन्यातच तिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. वाचकांच्या माहितीसाठी असे की, अगदीच कमी वयात अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये नाव कमावणारी पेरु देशातील ती लोकप्रिय कलाकार होती. तिने पेरूमधील प्रौढ चित्रपट उद्योगात लक्षणीय ओळख मिळवली होती.
अॅडल्ट सामग्रिची निर्मीती करणाऱ्या एका सहकाऱ्याने थाना फील्ड हिच्या मृत्यूची प्रसारमाध्यमांशी बोलताना पुष्टी केली आहे. थाना हिच्या अलेझांड्रा स्वीट या आणखी एका महिला सहकाऱ्याने सांगितले की, तिचा मृत्यू झाला आहे हे खरे आहे. मात्र, त्याबाबत मी अधिक काहीच बोलू शकत नाही, कारण मला आतीव दु:ख झाले आहे. अलेझांड्रा हिने आपली सहकारी थाना हिच्या निधनाबद्दल सोशल मीडियावरुनही तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. खास करुन तिने आपल्याला धक्का बसल्याची भावना व्यक्त केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तिने हे दु:ख चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (हेही वाचा, OnlyFans Porn: जॉब सोडून जोडप्याने 'ओन्ली फॅन्स’वर Sex Video बनवायला केली सुरुवात; महिन्याची कमाई ऐकून बसेल धक्का)
मिल्की पेरू या प्रॉडक्शन कंपनी फील्ड्सच्या सहकार्याने इंस्टाग्रामवर थाना फील्ड हिच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तिचा मृत्यू ही एक धक्कादायक आणि अविश्वसनीय घटना आहे. आम्हाला तिला पुन्हा जिवंत पाहण्याची इच्छा आहे. तिने ज्यांच्यासोबत काम केले त्यांच्यावर फील्ड्सचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो, असेही कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान, थाना फील्ड हिने काही दिवसांपूर्वीच आपल्या मूळ नावाने म्हणजेच अबीगेलसह पुढे येत पॉर्न इंडस्ट्रीमंधील आलेल्या हृदयद्रावक अनुभवाबद्दल सांगितले होते. आपण अॅडल्ट सामग्री निर्मिती सुरु केल्यानंतर मला लैंगिक छळ आणि अत्याचार सहन करावा लागला आहे. सुरुवातीला या इंडस्ट्रीमधील अनेकांना वाटले की, मला कामावर घेऊन ते माझ्यासोबत जे हवे ते करु शकतात. पण तो अनुभव माझ्यासाठी अत्यंत विचित्र आणि हृदयावर घाव घालणारा होता. अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करुन मी घरी आले तेव्हा अंघोळ केली आणि खूप रडले. माझ्यासोबत असे बरेचदा घडले. स्त्री म्हणून माझ्यासाठी अशी सामग्री तयार करणे प्रचंड कठीण होते. लिंडा लव्हलेसा हिच्यानंतर थाना फिल्ड हिने या विश्वातील अनेक धक्कादायक गोष्टी मांडल्या, असे बोलले जाते.