Lebanon Biggest Security Breach: लेबेनॉनमध्ये शक्तशाली स्फोट, हजारो जखमी; सर्वात मोठा सुरक्षा भंग, Hezbollah लक्ष्य
लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या संप्रेषण नेटवर्कला (Hezbollah’s Communication Network) लक्ष्य करणाऱ्या स्फोटानंतर (Lebanon Explosions) 1,000 हून अधिक लोक जखमी झाले. हिजबुल्लाहने या हल्ल्यांसाठी इस्रायलला जबाबदार धरले आणि याला त्यांचे सर्वात मोठे सुरक्षेचे उल्लंघन (Biggest Security Breach) म्हटले आहे.
Hezbollah Communication Network: दहशतवादी गट हिजबुल्लाहने (Hezbollah) वापरलेल्या पेजरला लक्ष्य करून झालेल्या स्फोटांच्या (Lebanon Explosions) मालिकेनंतर लेबनॉनमध्ये 1,000 हून अधिक व्यक्ती जखमी झाल्या आहेत. जवळजवळ एकाच वेळी झालेल्या या स्फोटांना हिजबुल्लाहने "सर्वात मोठा सुरक्षा भंग" (Biggest Security Breach) म्हणून वर्णन केले आहे. हिजबुल्लाहने या हल्ल्यासाठी इस्रायलला (Israel) जबाबदार धरले आहे, असा दावा केला आहे की हा त्याच्या संप्रेषण नेटवर्कचा "इस्रायली भंग" होता.
इराणच्या सरकारी माध्यमांनी सांगितले की, या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये लेबनॉनमधील इराणचे राजदूत होते. इराणच्या पाठिंब्याने लेबनॉनमधील राजकीय आणि लष्करी संस्था हिजबुल्लाह ऑक्टोबर 2023 मध्ये गाझा युद्ध सुरु झाल्यापासून इस्रायलशी जवळजवळ दररोज गोळीबार करत आहे. हिजबुल्लाह हा हमासचा एक कट्टर समर्थक आहे. जो 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यापासून इस्रायलशी संघर्ष करीत आहे. (हेही वाचा, Ayatollah Ali Khamenei on Indian Muslims: अयातुल्ला खामेनी यांच्या भारतीय मुस्लिमांबद्दल वक्तव्यावर MEA कडून तीव्र प्रतिक्रिया)
लेबनॉनमध्ये स्फोट
पेजरचा स्फोट दक्षिण लेबनॉन आणि बेरूतच्या उपनगरात झाला आहे. जिथे हिजबुल्लाहचा मोठा प्रभाव आहे. एएफपीशी बोलताना हिजबुल्लाहच्या जवळच्या एका सूत्रांनी पुष्टी केली की स्फोटात, 'हिजबुल्लाहचे डझनभर सदस्य जखमी झाले आहेत'. लेबनॉनच्या राष्ट्रीय वृत्तसंस्थेने या घटनेला 'अभूतपूर्व शत्रू सुरक्षा घटना' म्हटले आहे. तसेच, हिजबुल्लाहच्या दूरसंचार प्रणालीचे महत्त्वपूर्ण उल्लंघन म्हणून उल्लेखीत केले आहे. (हेही वाचा, Ismail Haniyeh Assassination: Hamas चा पॉलिटिकल ब्युरो चीफ ची Tehran मध्ये हत्या)
हिजबुल्लाह आपल्या स्वतः च्या संप्रेषण नेटवर्कवर अवलंबून आहे आणि त्याने आपल्या सदस्यांना संभाव्य इस्रायली देखरेख आणि उल्लंघनास प्रतिबंध करण्यासाठी मोबाइल फोन वापरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. हा निर्देश जवळजवळ एक वर्षापूर्वी गाझा युद्ध सुरू झाल्यापासून लागू आहे. (हेही वाचा, Israel-Palestine Conflict: इस्रायलने हमासच्या लष्करी कमांडरला केले लक्ष्य; दक्षिण गाझामध्ये 90 ठार)
देश आणि संघटनेत तणाव वाढला
या घटनेमुळे हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या शत्रुत्वात लक्षणीय वाढ झाली आहे. हमासच्या सुरुवातीच्या हल्ल्यापासून हिजबुल्लाह इस्रायलच्या स्थानावर नियमितपणे गोळीबार करत आहे, ज्यामुळे पॅलेस्टिनी अतिरेकी गटाला आपला पाठिंबा कायम आहे. इस्रायलने हिजबुल्लाहच्या भूमिकेला सातत्याने प्रत्युत्तर दिले आहे. या अभूतपूर्व सुरक्षा उल्लंघनामुळे या भागात तणाव वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे संघर्ष सुरू झाल्यापासून लष्करी आणि राजकीय अस्थिरता वाढली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)