Typhoon Yagi Devastates Vietnam: व्हिएतनाम येथील उत्तरेकडील प्रदेशात भूस्खलन आणि पुरामुळे 254 जणांचा मृत्यू; 82 बेपत्ता

तर 82 जण बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने दिली आहे.

Photo Credit- X

Typhoon Yagi Devastates Vietnam: यागी चक्रीवादळात झालेल्या भूस्खलन आणि पुरामुळे व्हिएतनामच्या उत्तरेकडील भागात 254 जणांचा मृत्यू झाला आणि 82 बेपत्ता झाल्याची माहिती व्हिएतनामच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने दिली. लाओ काई, काओ बँग आणि येन बाई हे यागी चक्रीवादळात सर्वात जास्त प्रभावित झालेले प्रांत आहेत. ज्यात अनुक्रमे 111, 43 आणि 49 मृत्यू झाले आहेत, असे शिन्हुआ वृत्तसंस्थेने शुक्रवारी सांगितले. (हेही वाचा:Yagi Typhoon: व्हिएतनाममध्ये यागी वादळामुळे भूस्खलन होऊन 35 जणांचा मृत्यू, 24 बेपत्ता; अनेक भागात वीज पुरवठा खंडित )

तेथे वाहणाऱ्या नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. सर्व नद्यांना पूर आला आहे. सध्या तेथे आपत्ती व्यवस्थापन संस्थांकडून बचावकार्य सुरू आहे. पूरग्रस्त भागात बचावकार्यासाठी सैन्याची जमवाजमव करण्यात येत आहे. व्हिएतनाम न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, चक्रीवादळाने इमारतीचे नुकसान झाल्यानंतर सुमारे एक आठवड्यानंतर, हेरिटेजने अधिकृतपणे पर्यटक बोटींचे सामान्य ऑपरेशन शुक्रवारी पुन्हा सुरू केले आहे. यागी वादळामुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी देशभरातील लोकांकडून सुमारे 775.5 अब्ज ($31.5 दशलक्ष) मदत निधी प्राप्त झाला आहे, असे व्हिएतनाम फादरलँड फ्रंटने जाहीर केले आहे. (हेही वाचा:Typhoon Yagi Video: चीनमध्ये निसर्ग कोपला! यागी विशानकारी वादळामुळे अनेक इमारतींचे नुकसान; 4 नागरिकांचा मृत्यू )

व्हिएतनाममध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे लाखो लोकांनी आपली घरे गमावली आहेत. पूरग्रस्तांना शुद्ध पाणी, अन्न, कपडे यांसह स्वच्छता आणि आरोग्यसेवेचा अभाव आहे, असे यूएन चिल्ड्रेन एजन्सी (युनिसेफ) ने एका निवेदनात म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif