उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन (Kim Jong-un) याच्याबद्दल बऱ्या वाईट (खास करुन वाईटच) बातम्या नेहमीच ऐकायला मिळतात. या सर्वच बातम्या शक्यतो सूत्रांनी दिलेल्या माहितीवर आधारीत असतात. त्यामुळे या घटना निश्चित घडल्या आहेत किंवा नाही याबाबत फारसे कोणालाच कळत नाही. आताही प्रसारमाध्यमांतून असेच एक वृत्त झळकत आहे. किम याने म्हणे जनरल पदावरील एका व्यक्तीस टक्क फिश टँकमध्ये टाकूले आणि मृत्यूच्या खाईत ढकलले. अर्थात, तो व्यक्ती कोण होता याबाबत फारशी माहिती नव्हती. मात्र, किम द्वारा निर्मित यंत्रणेमध्ये हा व्यक्ती चांगल्या पदावर होता. मात्र, काही काळापासून या व्यक्तीवर फसवणूक आणि हेरगिरी केल्याचा संशय होता. त्याने बंडाचा कट रचल्याचाही किमला आणि त्यांच्या टीमला संशय होता म्हणे.
सांगितले जाते की, किम जोंग ज्या ठिकाणी राहतो त्या परिसरात अत्यंत घातक मानल्या जाणाऱ्या विविध माशांनी भरलेले फिश टँक उभारण्यात आले आहेत. यापैकीच एका टँकमध्ये पीडित व्यक्तीचे हातपाय कापून त्याला माशांच्या हवाली करण्यात आले. दरम्यान, जनरलचा मृत्यू झाला ही बाब खरी असली तरी तो पाण्यात बुडाल्याने मृत्यू पावला की त्याला माशांनी खाल्ला आणि झालेल्या जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला याबाबत कोणतीच माहिती पुढे आली नाही. जेम्स बॉन्ड याच्या 1977 मध्ये आलेल्या 'द स्पाय हू लव्हड मी' या चित्रपटातील दृश्य पाहून उत्तर कोरियाचा नेता भलताच प्रेरित झाला. त्यातूनच या महोदयांनी सदर जनरलला अशा पद्धतीने निरोप दिला. कथानकानुसार चित्रपटातील खलनायक कार्ल स्ट्रॉमबर्ग हा त्याच्या विरोधकांना शार्क असलेल्या फिश टँकमध्ये टाकून त्यांची हत्या करत असल्याचे दृश्य आहे.
असेही बोलले जाते की, किम याच्या मत्स्यालयात ब्राझीलहून आणलेल्या खतरणाक अशा विविध माशांचा समावेश आहे. ज्यांचे दात एखाद्या शस्त्राप्रमाणे धारधार असतात. त्यांच्या भक्ष्याला ते अवघ्या काहीच मिनिटांमध्ये फाडू शकतात. किमने सत्ता हाती घेतल्यापासून आतापर्यंत प्रमुख 16 अधिकाऱ्यांना फाशी दिले किंवा त्यांना जीवानिशी संपवल्याची चर्चा असते. याआधीही त्याने एका जनरलला (2019) अशाच प्रकारे फाशी दिली होती. त्याच्यावरही सत्तापालटाचा कट रचल्याचा आरोप होता म्हणे.
वाचकांच्या माहितीसाठी असे की, किम जोंग उन हा उत्तर कोरियाचा सर्व्हेसर्वा आहे. जगभरातील अनेक देश आणि प्रसारमाध्यमे त्याला हुकुमशाहा म्हणून ओळखतात. सन 2011 मध्ये त्याने सत्ताग्रहण केले. सन 2012 पासून ते कोरियाच्या (उत्तर) वर्क्रर्स पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत.