DNA चाचणीमुळे उलघडला 34 वर्षांपूर्वीच्या हत्येचे रहस्य; काय घडलं नेमकं? घ्या जाणून

अमेरिकेतील (US) पोलिसांनी चक्क डीएनए (DNA) तंत्रज्ञानाच्या जोरावर 34 वर्षे जुन्या एका हत्या प्रकरणाचा छडा लावला आहे. अत्यंत आव्हानात्मक पण विजनवासात गेलेल्या या हत्या प्रकरणाचा छडा लागल्यांने अनेकांनी पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. महत्त्वाचे म्हणजे अत्यंत गुंतागुंतीचे असलेल्या अशा या प्रकरणाला 34 वर्षांनी वाचा फुटली.

Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

अमेरिकेतील (US) पोलिसांनी चक्क डीएनए (DNA) तंत्रज्ञानाच्या जोरावर 34 वर्षे जुन्या एका हत्या प्रकरणाचा छडा लावला आहे. अत्यंत आव्हानात्मक पण विजनवासात गेलेल्या या हत्या प्रकरणाचा छडा लागल्यांने अनेकांनी पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. महत्त्वाचे म्हणजे अत्यंत गुंतागुंतीचे असलेल्या अशा या प्रकरणाला 34 वर्षांनी वाचा फुटली. एनबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार 23 ऑक्टोबर 1988 मध्ये 26 वर्षीय एना काने (Anna Kane) हिची गळा आवळून हत्या करण्यात आली. हत्येनंतर तिचे शव पेरी टाऊनशिप येथील परिसरात आढळून आले होते. हत्या कोणी केला याबाबत एक धाका पोलिसांना मिळाला होता. परंतू, मारेकऱ्यापर्यंत पोहचण्यास पोलिसांना यश आले नव्हते.मात्र, डीएनए तंत्रज्ञानाच्या मदतीने अखेर या खुनाचा उलघडा झाला आहे.

एना काने (Anna Kane) हित्या हत्येबाबत माहिती देण्यासाठई एक पत्र स्थानिक वृत्तपत्राच्या कचेरीत पाठविण्यात आले होते. या पत्राच्या माध्यमातूनच पोलीस मारेकऱ्यापर्यंत पोहोचले. मारेकऱ्याची ओळख स्कॉट ग्रिम (Scott Grim) अशी पोलिसांनी पटवली आहे. (हेही वाचा, Nagpur: भूतबाधा झाल्याचा संशय, पोटच्या मुलीला जीव जाईपर्यंत अमानुष मारहाण, नागपूर येथील आई-वडीलांचे क्रुर कृत्य)

एना काने हत्या प्रकरणाबाबत याहू न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, 'फॉरेन्सीक पॅथोलॉजिस्ट डॉ. नील यांनी माहिती देताना सांगितले की, केन यांची हत्या रशीने गळा आवळून करण्यात आली. त्यांच्या चेहऱ्यावरही मारहाणीच्या खुणा होत्या.' दरम्यान, अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, केन यांचा मृतदेह पोलिसांना मिळण्यापूर्वी साधारण 12 तासांपूर्वी त्यांची हत्या झाली होती. प्राप्त पुराव्यांनुसार केन यांचे कपडे ओले नव्हते. मात्र, केन यांचा मृतदेह सापडला तेव्हा रात्रीच्या वेळी त्या परिसरात प्रचंड वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला होता.

एनबीसी न्यूजने म्हटले आहे की, बर्क्स क्लाऊंडी जिल्ह्यातील के अटॉर्नी जॉन एडम्स यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले की, हत्येनंतर काने यांच्या कपड्यांवरील सर्व डीएनएस पुरावे एकत्र करण्यात आले होते. जेव्हा ते टेस्ट करण्यात आले तेव्हा पोलिसांना ते डीएनए नमुने एका पुरुषाच्या डीएनएशी जुळले. परंतू, त्या पुरुषाचे डीएनए इतर कोणाशीही जुळले नाहीत.

फेब्रुवारी 1990 मध्ये रीडिंग इगल नावाच्या एका स्थानिक वृत्तपत्राच्या कचेरीत एक निनावी पत्र आले होते. यात एका नागरिकाने काळजीयुक्त स्वरात लिहीले होते की, त्याच्याकडे या प्रकरणाशी संबंधीत बरीचशी माहिती आहे. पेनसिलवेनिया पोलीसांच्या डेनियन वूमर यांनी म्हटले की, तपास अधिकाऱ्यांना खात्री पटली की ज्याने हे पत्र लिहीले आहे त्यानेच हत्या केली आहे. हे पत्र लाळेद्वारे चीटकविण्यात आले होते. या लाळेचे नमुने डीएनए टेस्टसाठी पाठिविण्यात आले होते. शेवटी हे डीएनए केन हिच्या कपड्यांवर आढळून आले होते. हे DNA profile जुळले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now