Coronavirus | Archived, edited, symbolic images)

कोरना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची जगभरातील आकडेवारी थांबण्याचे अद्याप कोणतेही चिन्ह दिसत नाही. त्यामुळे जगभरातील कोरोना व्हायरस (COVID-19) संक्रमित रुग्णांची संख्या तब्बल 62 लाखांहून अधिक झाली आहे. तर कोरोना व्हायरस संक्रमित मृतांची आकडेवारी 375,000 पार झाली आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी (Johns Hopkins University) संचलीत सेंटर फॉर सिस्टम सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग (Center for Systems Science and Engineering)ने ही माहिती दिली.

यूनिवर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग (सीएसएसई) द्वारा प्राप्त ताज्या आकडेवारीत पुढे आले आहे की, मंगळवारी सकाळी जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 6,265,496 इतकी झाली आहे. तर कोरना व्हायरस संक्रमित रुग्णांची मृत्यूची संख्या 375,526 इतकी झाली आहे.

सीएसएसईने दिलेल्या माहितीनुसार 1,811,370 रुग्णसंख्या आणि 105,165 मृत्यूसह अमेरिका हा जगातील कोरोनाचा फटका बसलेला सर्वात अव्वल देश आहे. तर 526,447 रुग्णांसह ब्राजील दुसऱ्या क्रमांकावर आहे.  (हेही वाचा, Ebola: कोरोना व्हायरस नंतर आता इबोला ने 'या' देशात घेतले चार बळी; WHO तर्फे करण्यात आली पुष्टी)

देशभरातील कोरोना व्हायरस संक्रमित देशांची यादी

  • रशिया- 414,328
  • इंग्लंड- 277,736
  • स्पेन- 239,638
  • इटली- 233,197
  • भारत- 198,370
  • फ्रांस- 189,348
  • जर्मनी- 183,594
  • पेरू- 170,039
  • तुर्की- 164,769
  • ईरान- 154,445
  • चिली- 105,158

कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा सर्वाधिक मृत्यू झालेला इंग्लंड हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश आहे. तर कोरोनामुळे दहा हजारांहून अधिक मृत्यू झालेल्या देशांमध्ये इटली (33,475), ब्राजील (29,937), फ्रांस (28,836), स्पेन (27,127) आणि मेक्सिको (10,167) या देशांचा समावेश आहे.