कोरोना व्हायरसने (Coronavirus) 170 हून अधिक देशात धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊन आतापर्यंत 11 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 लाखाहून अधिक लोकांना या व्हायरची लागण झाली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या संबंधित अफवा पसरवली जात असल्याची समोर आली आहे. यातच सर्दी, ताप, खोकला इतकीच कोरोना व्हायरसची लक्षणे नाहीत. कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर नेमके काय होते. हा अनुभव एका कोरोनाग्रस्त महिलेने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. कोरोना व्हायरस बाबत लोकांना योग्य माहिती मिळावी. तसेच लोकांच्या मनात कोणताही चुकीचा गैरसमज राहू नये, या हेतूने संबंधित महिलेने आपला अनुभव शेअर केला आहे. तर कोरोना व्हायरसची लक्षणे जाणून घेण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.
बजोंडा हलीती (Bjonda Haliti) असे कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडलेल्या महिलेचे नाव आहे. तसेच कोरोनाच्या बाबतीत लोकांच्या मनात कोणतीही भिती निर्माण होऊ नये, असाही तिने प्रयत्न केला आहे. सुरुवातीला बजोंडाला कोरडा खोकला होता. घशात थोडीशी खवखव वाटत होती. याशिवाय तिला थकवाही जाणवत असल्याचे तिने सांगितले. मात्र काही दिवसानंतर तिचे डोके जड झाले. यासोबत ताप आणि थंडी जाणवत होती. सर्वात महत्वाचे म्हणजे डोळ्यांमध्ये वेदना आणि तोंडात कडवट चव होती, असेही तिने सांगितले आहे. तिसऱ्या दिवशी बजोंडा डॉक्टर कडे गेली असताना तिला प्लू किंवा स्ट्रेप असे काही नसल्याचे सांगितले. दरम्यान, तिला ऍंटीबायोटिक्स घेण्याचा सल्ला देण्यात आला. चौथ्या दिवशी बिंजोडाचा ताप पूर्णपणे गेला. मात्र, इतर लक्षणे दिसून आली. याशिवाय श्वास घेण्यात समस्या जाणवू लागली. बजोंडा म्हणाली की, मला माझ्या छातीवर मोठा दगड ठेवल्यासारखे वाटत होते. अखेर मी कोरोना व्हायरसचा टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने स्वताला बंदिस्तही करुन घेतले. डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर तिला कोरोना व्हायरस झाल्याचे समजले. मात्र, बजोंडाने ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, ती बरी होत असल्याची माहिती तिने दिली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: इटली मध्ये 24 तासांत 800 जणांचा बळी; मृतांची संख्या 4 हजार 825 वर
ट्वीट-
I’m 22 years old and I tested positive for COVID-19.
I’ve been debating on posting, but I want to share my experience especially with those around my age to help bring awareness, and to relieve any stress/anxiety some may have due to the pandemic.
— Bjonda Haliti (@baeonda) March 18, 2020
ट्वीट-
Health update: I am feeling well today, normal energy levels. I do have a little bit of sinus pressure and headache, but I am continuing to hydrate as much as possible and overall I am in good health!
— Bjonda Haliti (@baeonda) March 20, 2020
देशात कोरोनाचा वाढता विळखा पाहता आता नागरिकांनी अधिक सज्ज होण्याची वेळ आली आहे. 31 मार्च पर्यंत सरकारने खाजगी संस्था, ऑफिस बंद ठेवण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आलेआहे. आज संपूर्ण देशभर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 'जनता कर्फ्यू'चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 7 ते रात्री 9 मध्ये नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मुंबईमध्ये कोरोनाबधितांपैकी आज दुसरा बळी गेला आहे. दरम्यान, उपचारादरम्यान आज (22 मार्च) 63 वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांपैकी मृतांचा आकडा आता 5 झाला आहे. मुंबई येथील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात आज एका कोरोनाबाधीत व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृताचा परदेशी प्रवासाचा इतिहास आहे.