कोरोना व्हायरसने (Corona Virus) चीनसह (China) संपूर्ण जगभरात थैमान घातले असून आतापर्यंत 492 जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर सगळेच धास्तावले असताना एका तरुणीने करोना व्हायरसमुळे भीती दाखवून स्वत:चा बचाव करून घेतला आहे. चोरी करण्याच्या हेतूने आलेल्या एका चोराने घरात महिलेला एकटे पाहून तिच्यावर बलात्कार करण्याच्या पयत्न केला होता. त्यावेळी महिलेने खोकण्याचे नाटक करून आपल्यासा कोरोना व्हायरसी लागण झाल्याचे सांगितले. हे ऐकताच घाबरलेल्या चोराने तिला सोडून पळून गेला. ही घटना चीनच्या जिंगशान (Jingshan) भागामध्ये घडली आहे.

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून लोक घराबाहेर पडायला तयार नाहीत. तसेच एका ठिकाणी जमाव करू नये, असे आवाहन सरकारकडून नागरिकांना करण्यात आले आहे. याचाच फायदा घेत एका तरूण जिंगशान परिसरातील एका घरात चोरी करण्याच्या हेतूने शिरला होता. त्यावेळी घरात एकटी महिलेला पाहून त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. आपल्यावर ओढवलेल्या संकटात प्रसंगावधान राखून तिने त्याला सांगितलं की, मी नुकतीच वुहानमधून परतले आहे. मला करोना व्हायरसची लागण झालेली आहे. हे ऐकताच चोर घाबरला. कोरोना व्हायरच्या भितीने घाबरून त्या चोराने तिला सोडून दिले आणि पळ काढला. परंतु चोराने तिच्याकडून 338 डॉलर घेऊन गेल्याची तक्रार संबंधित महिलेने पोलिसांत नोंदवली आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे चीन येथे सर्वजण मास्क घालून फिरत असल्यामुळे पोलिसांना आरोपीला शोधण्यात अडचण येत आहे. हे देखील वाचा- Coronavirus च्या जाळ्यातून नागरिकांना वाचवण्यासाठी ठोस पावले उचलणार- अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

भारताचे शेजारी राष्ट्र असलेला चीन येथे सध्या कोरोना व्हायरस संकटाचा सामना करत आहे. केवळ चीनच नव्हे तर जगभरातील अनेक देशांसमोर या संकटाने आव्हान निर्माण केले आहे. चीनमधील वुहान शहरातून उगम पावलेल्या या कोरोना व्हायरसने आतापर्यंत विविध देशांतील सुमारे 492 नागरिकांचा बळी घेतला आहे. जगभरातील विविध 20 देशांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून, तब्बल 24,000 लोकांना या रोगाची लागण झाल्याचा आकडा प्रसारमाध्यमांनी दिला आहे.