Afghanistan: अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी (Taliban) ताबा मिळवल्यानंतर महिलांसंबंधित नियम अधिकाधिक वाढवले जात आहेत. अशातच तालिबान्यांनी महिलांसाठी नवे आदेश जाहीर केले आहेत. त्यानुसार टेलिव्हिजन वाहिन्यांनी त्यांच्या मालिका बंद कराव्यात ज्या मध्ये महिला अभिनेत्री काम करतात. नैतिकता आणि गैरवर्तन निर्मूलन मंत्रालयाने अफगाण मीडियाला जारी केलेला हा पहिलाच आदेश आहे.
त्याचसोबत तालिबानाने टेलिव्हिजनवर येणाऱ्या महिला पत्रकारांना न्यूज रिपोर्ट सांगताना हिजाब घालावा असे ही म्हटले आहे. या व्यतिरिक्त चॅनल्सने असे काही सिनेमे किंवा कार्यक्रम दाखवू नये ज्यामध्ये पैगंबर मोहम्मद किंवा अन्य सन्मानित व्यक्तींसदर्भात काही दाखवले जाईल. त्यावर पूर्णपणे बंदी घालावी असे आव्हान केले असून ते अफगाणच्या मुल्यांच्या विरोधात आहे.(पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांना इमरान खान यांच्या सरकारने दिले आदेश, बातमीपूर्वी दाखवावा देशाचा नकाशा)
मंत्रालयाचे प्रवक्ते हाकिफ मोहजीर यांनी न्यूज एजेंसी एएफपी यांना सांगितले की, हे नियम नसून धार्मिक गाइडलाइन्स आहेत. या गाइडलाइन्स रविवारी सोशल मीडियात खुप व्हायरल झाल्या. तालिबानने दोहा मध्ये झालेल्या करारात आश्वासन दिले होते की, ते आधीसारखे शासन लागू करणार नाहीत आणि खुल्या विचारांनी परतलो आहोत. मात्र त्यांनी त्यांचे नियम लागू करणे सुरुच केले. त्यामध्ये सर्वाधिक नियम हे महिलांसंबंधित घेण्यात आले आहेत.
मीडियासंबंधित तालिबान्यांनी त्यांना स्वातंत्र्य मिळेल असे म्हटले होते. परंतु अफगाणिस्तानमध्ये पत्रकारांना मारहाण केली जात आहे. देशावर 15 ऑगस्टला तालिबान्यांनी ताबा मिळवला. तर 20 वर्षानंतर त्यांनी तेथे आपली सत्ता स्थापन केली.