बगदादमधील अमेरिकन दूतावासाला (US Embassy) लक्ष्य करून तीन रॉकेट टाकुन हल्ला करण्यात आला आहे. इराकी सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, बगदादमधील अत्यंत सुरक्षित भागात असलेल्या अमेरिकन दूतावासाला लक्ष्य करून गुरुवारी किमान तीन रॉकेट (Rocket Attack) टाकण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापैकी दोन रॉकेट दूतावासाजवळ आले, तर तिसरे रॉकेट जवळच्या निवासी संकुलात असलेल्या शाळेवर आदळले. इराकी सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की बगदादमधील अमेरिकन दूतावासावर रॉकेट हल्ल्यात एक मूल आणि एक महिला जखमी झाली आहे.
Tweet
BREAKING : Rocket Attack on U.S. embassy in Baghdad tonight, U.S. military’s C-RAM engaging. #USEmbassy #Baghdad #embassy #Iraq pic.twitter.com/11MlEZ0HmC
— Carnz (@adamo_carnz) January 14, 2022
बगदादमधील अमेरिकन दूतावासाला लक्ष्य करण्यात आले
या वर्षाच्या सुरुवातीपासून इराकमध्ये अमेरिकेच्या उपस्थितीला लक्ष्य करून ड्रोन आणि रॉकेट हल्ल्यांची मालिका सुरू आहे. हे हल्ले अमेरिकेच्या हल्ल्याच्या दुसर्या वर्धापन दिनानंतर सुरु झाले आहेत ज्यात इराणी जनरल कासिम सुलेमानी आणि इराकी मिलिशिया कमांडर अबू महदी अल-मुहांदीस मारले गेले. या हल्ल्यात जीवितहानी झाली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याआधी, गेल्या गुरुवारी इराक आणि सीरियामध्ये अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करून अनेक हल्ले झाले होते. (हे ही वाचा New York मध्ये JFK Airport वर भारतीय वंशाच्या शीख व्यक्तीला मारहाण करत पगडी फेकल्याचा प्रकार आला समोर; व्हिडीओ वायरल झाल्यानंतर अमेरिकेकडून निषेध)
बगदादवर तीन रॉकेट टाकण्यात आले
मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्यात इराकमधील अमेरिकन दूतावासाला लक्ष्य करून अनेक हल्ले झाले आहेत, ज्यापैकी काही अमेरिकेने इराण-संलग्न मिलिशिया गटावर आरोप केले आहेत. या हल्ल्यांमध्ये अमेरिकन लष्करी आणि मुत्सद्दी कर्मचार्यांना होस्ट करणाऱ्या तळ आणि प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्यात आले. सध्या बगदादमधील ताज्या हल्ल्यात एक महिला आणि एक मूल जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.