Maharashtra's Monsoon Magic: महाराष्ट्रात मान्सूनचा अनुभव द्विगुणित करतील ही '5' ठिकाणं

By Dipali NevarekarOctober 15, 8603

ताम्हिणी घाट

ताम्हिणी घाट देखील लोणावळा सारखाच पावसाळ्यात हिरवळीने बहरून जातो. लॉंग ड्राईव्हची क्रेझ असलेल्यांना पावसाळ्यात ताम्हिणी घाटात मोहक निसर्गसौंदर्य पाहता येऊ शकतं.

भुशी डॅम

पावसाळ्यात विकेंडला हमखास हाऊसफुल्ल असलेलं एक ठिकाण म्हणजे भुशी डॅम आहे. पुण्यानजिक भुशी डॅम वर पावसाचा आनंद लुटणार्‍यांची मोठी गर्दी असते.

माळशेज घाट

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामध्ये माळशेज घाट वसला आहे. पावसाळ्यात घनदाट हिरवळ, त्यामधून खळाळणारे धबधबे यांमुळे सारा नजारा अगदी विहंगम होतो.ट्रेकर्स आणि वन्यजीवप्रेमींसाठी हे ठिकाण पर्वणी आहे.

आंबोळी धबधबा

आंबोळी चा उल्लेख अनेकदा "Switzerland of Maharashtra" असा हतो. सह्याद्रीच्या कुशीत पावसाळ्यात थंड वातावरण, हिरवळ आणि कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी मोठी गर्दी असते. महादेवगडावर गेल्यास पावसाळ्यात चालणारे ढग देखील न्याहाळता येतात.

महाबळेश्वर

थंडीच्या दिवसांप्रमाणेच महाबळेश्वर हे पावसाळ्यातही पर्यटकांनी बहरलेलं असतं. पावसाळ्यात महाबळेश्वर मध्ये दाटून आलेले ढग आणि धुक्यात कोसळणारा पाऊस पाहण्यासाठी या हिल स्टेशन वरही मोठी गर्दी असते.