Waterfalls In Karjat: कर्जत मधील निसर्गाच्या कुशीत वसलेले लोकप्रिय धबधबे
By Dipali NevarekarJanuary 01, 1970
पळसदरी धबधबा
पळसदरी धबधबा कर्जत मधील अजून एक आकर्षण आहे. 40-50 फूटावरील कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची पावसाच्या दिवसात मोठी गर्दी असते. (Photo Credit: wikipedia)
भिवपुरी धबधबा
भिवपुरी धबधबा हा स्टेशन पासून 30 मिनिटांच्या ट्रेकिंग नंतर अनुभवता येतो. निसर्गाच्या दाट हिरवळीमध्ये कोसळणारा हा धबधबा नयनरम्य आहे. (Photo Credit: instagram/Bhivpuri Waterfalls)
सुभेदार धबधबा
उल्हास नदीच्या उगमाजवळ कोंढाणा लेणी च्या जवळ हा सुभेदार धबधबा आहे. निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी अनेक कुटुंब इथे हमखास पावसाळ्यात भेटीला आहे. (Photo Credit: instagram/travelgeek_lp)
सोलनपाडा धबधबा
सोलनपाडा धबधब्याचा अनुभव डोळ्यात भरणारा आहे. या धबधब्याच्या तळाशी एक तलाव आहे. कर्जत स्टेशन वरून सोलनपाड्याला जातानाही एक लहानसा ट्रेक करून जाता येते. (Photo Credit:facebook.com/manoj.sawant.12)
आषाणे धबधबा
मुंबई आणि पुण्याजवळील पर्यटकांसाठी आषाणे धबधबा हा आकर्षणाचं केंद्र आहे. कर्जत कल्याण मार्गावर आषाणे गावाच्या मागे हा धबधबा आहे. (Photo Credit: instagram/_divya_0418)