Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात केस गळती रोखायला मदत करतील या टीप्स

By Dipali NevarekarJanuary 01, 1970

प्रोटीन युक्त आहार

संतुलित आहारासोबत तुमच्या शरीराच्या वजनाच्या प्रति किलो 1 ग्रॅम प्रथिने घ्या. प्रथिने हे केसांचा आधारस्तंभ आहे आणि निरोगी केस राखण्यासाठी योग्य प्रमाणात सेवन करणे महत्वाचे आहे.

लोह आणि फॉलिक अ‍ॅसिड

पावसाळ्यात केस गळणं रोखण्यासाठी लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडचा आहारात समावेश वाढवा. त्यासाठी रोज खजूर, अंजीर खाण्याची सवय ठेवा.

घरगुती तेल

केस गळणं कमी करायचं असेल तर मोहरीचे तेल, बदाम तेल, एरंडेल तेल, मेथीचे दाणे, कढीपत्ता आणि रोझमेरी पाने यांचं मिश्रण केलेले तेल केस धुण्यापूर्वी किमान 30-60 मिनिटं लावा.

कढीपत्ता

कढीपत्ता मध्ये amino acids, antioxidants, beta-carotene यांचा समावेश असतो. रोजच्या जेवणात (डाळ, भाजी) असलेला कढीपत्ता चावून चावून खा.

ओमेगा 3 सप्लिमेंट्स

केसांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आहारात omega-3 fatty acids चा समावेश करणं आवश्यक आहे. त्यासाठी आहारात अळशी, चिया सीड्स, अक्रोड यांचा समावेश करा.