Monsoon Diet Tips: पावसाळ्यात 'हे' पदार्थ खाणे टाळा, अन्यथा उद्भवू शकतात आरोग्य समस्या

By Bhakti AghavOctober 03, 4797

सीफूड्स

पावसाळ्यात समुद्री अन्न टाळावे. या हंगामात बॅक्टेरिया आणि विषाणू वेगाने वाढतात. म्हणून, सीफूड्स खाल्ल्याने संसर्गाचा धोका वाढतो. (Photo Credit - pixabay)

बऱ्याच वेळ कापून ठेवलेली फळे

कापलेली फळे बाजारात किंवा रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये बराच काळ ठेवली जातात, ज्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया आणि बुरशीचा धोका वाढतो. (Photo Credit - Pixabay)

स्ट्रीट फूड्स

पावसाळ्यात गोलगप्पा, चाट, भेळपुरी इत्यादी स्ट्रीट फूड खाणे टाळा. पावसामुळे रस्त्यांवर घाण आणि चिखल असतो, ज्यामुळे उघड्यावर विकल्या जाणाऱ्या अन्नामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. (Photo Credit - Pixabay)

मसालेदार आणि तळलेले पदार्थ

पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते. पावसाळ्यात पकोडे, समोसे, चिप्स आणि इतर तळलेले स्नॅक्स खाणे टाळा. (Photo Credit - Pixabay)