सायकलिंग हा एक उत्तम कार्डिओ व्यायामप्रकार आहे. वजन घटवण्यासाठी त्याचा पर्यायी व्यायम म्हणून विचार केला जातो. (Photo Credit: Pixabay.com)
Tour de France ही सायकलिंग मधील सर्वात कठीण स्पर्धा आहे. दरवर्षी जुलै महिन्यात 3 आठवडे 3600 किमी अंतराची ही शर्यत असते. (Photo Credit: Pixabay.com)
डेन्मार्क, जपान आणि नेदरलॅंड मध्ये सायकल हे वाहतूकीचं प्रमुख साधन आहे. अन्य वाहनांपेक्षा सायकल कडे लोकांचा अधिक कल असतो. (Photo Credit: Pixabay.com)
नेदरलॅंड मध्ये प्रति व्यक्ती सर्वाधिक सायकलिंग करतात. इथे सर्रास लोकं कमी अंतरावर जाण्यासाठी सायकल वापरताना दिसतात. (Photo Credit: Pixabay.com)
सायकलिंगचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे. हृद्यासोबतच फुफ्फुसं आणि मांसपेशींना बळकटी देण्यासाठी सायकलिंग फायदेशीर आहे. (Photo Credit: Pixabay.com)