Shiv Rajyabhishek Din 2025: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणार्‍या या गडकिल्ल्यांना एकदा नक्की भेट द्या

By Dipali NevarekarMay 30, 1261

शिवनेरी

शिवनेरी किल्ला शिवरायांचे जन्मस्थळ असल्याने शिवभक्तांमध्ये त्याची खास ओढ असते.किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकायला कठीण असा बालेकिल्ला आहे.

रायगड

मराठा सम्राज्यातील रायगड महत्त्वाचा किल्ला आहे.शिवरायांनी त्याला राजधानी बनवत येथेच शिवराज्याभिषेक सोहळा केला होता. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते.

प्रतापगड

प्रतापगडाचा दरवाजा आजही शिवकालीन रितीप्रमाणे सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो.अफझलखानाने दगा केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मारले होते.

पन्हाळा

पन्हाळा शिवरायांच्या साम्राज्यातील आणि आयुष्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. कोल्हापूरातील हा किल्ला 1200 वर्ष जुना आहे.

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग हा शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे.या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे.किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीचा प्रवास आहे.