Vat Purnima 2025: जिनिलिया देशमुख ते अंकिता वालावलकर कलाकारांनी साजरा केला वटपौर्णिमेचा सण
By Dipali NevarekarSeptember 07, 6429
तितिक्षा तावडे
तितिक्षा तावडे ने देखील आज वटपौर्णिमेचा सण साजरा केला आहे. सिद्धार्थ बोडके सोबत मागील वर्षी तिचा विवाह झाला आहे. (Insatgram/Titeekshaa Tawde)
शिवानी सोनार
शिवानी सोनारची देखील यंदा पहिलीच वटपौर्णिमा आहे. साडी नेसून नटून थटून तिने आज वडाची पूजा केली आहे. (Instagram/ShivaniSonar)
शाल्व आणि श्रेया
अभिनेता शाल्व किंजवडेकर त्याची बालपणीची मैत्रिण श्रेया सोबत डिसेंबर 2024 मध्ये विवाहबद्ध झाला. यंदा त्यांची पहिली वटपौर्णिमा आहे. (Instagram/Shreya Daflapurkar Kinjawadekar)
जिनिलिया देशमुख
अभिनेत्री जिनिलियाने देखील पती रितेश देशमुख साठी आज वट सावित्रीचं व्रत केले आहे. घरीच तिने वडाची पूजा केली. (Instagram/Genelia Deshmukh)
अंकिता प्रभु वालावलकर
सोशल मीडीया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभु वालावलकर ची यंदा पहिली वटपौर्णिमा आहे. माणगावला तिच्या सासरी तिने सासू सोबत ट्विनिंग करत हा सण साजरा केला आहे. (Instagram/ Ankita PrabhuWalawalkar)