दीपा नावाने प्रसिद्ध असलेली 29 वर्षीय तामिळ अभिनेत्री पॉलीन जेसिका हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. चेन्नई येथील एका इमारतीमध्ये घराच्या छताला असलेल्या पंख्याला लटकलेला तिचा मृतदेह 18 सप्टेंबर रोजी आढळून आला. पोलिसांना दीपाच्या खोलीतून एक संशयास्पद चिठ्ठी आल्याची चर्चा आहे. या चिठ्ठीमुळे आत्महत्येच्या संशयासोबतच इतरही अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहे.