टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलला कोरोनाची लागण झाली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी गुरुवारी मुंबईत झालेल्या बोर्डाच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीनंतर राहुलला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी T20I संघात केएल राहुलला स्थान देण्यात आले होते.दरम्यान, कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तो वेस्ट इंडिजला जाणार की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.