भारतातून Facebook, Twitter, Instagram खरोखरच बंद होईल काय? येत्या दोन दिवसांत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता
Social Media | Representative Image (Photo Credits: Pixabay)

सोशल मीडिया (Social Media) वापरणाऱ्या अनेक युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे की, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम (Facebook Twitter Instagram) यांसारख्या कंपन्या भारतात काम करणे बंद करणार आहेत. या चर्चांना आतापर्यंत कोणाकडूनही अधिकृतपणे दुजोरा मिळाला नाही. तरीही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात येत्या दोन दिवसांत म्हणजेच 27 मे पर्यंत केंद्र सरकार याबाबत काहीतरी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, इकेक्ट्रॉनिक्स आणि इन्फरमेशन टेक्नोलॉजी मंत्रालय (MEITY) ने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना (Social Media Companies) नव्या नियमांचे पालन करण्याच्या अंमलबजावणीसाठी तीन महिन्यांचा वेळ दिला होता. यात भारतातील कार्यालयांमध्ये संपर्क अधिकारी, संपर्कासाठी पत्ता, तक्रारनिवारण अधिकारी, आक्षेपार्ह आशयाचा तपास, कंपनीचा अहवाल यांसारख्या अनेक नियमांचा समावेश आहे.

सोशल मीडिया वर काही आक्षेपार्ह आढळल्यास युजर्सला हे माहिती नसते की, कोणाकडे तक्रार करायची. त्यांच्या शंकांचे निरसण कोठे होईल. काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी केंद्र सरकारच्या नियामांचे पालन करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी मागितला होता. काहींनी म्हटले होते की ते अमेरिकेतील आपल्या हेडक्वार्टरशी संबंधीत आदेशांचे पालन करत आहेत. या कंपन्या भारतात काम करत आहेत. भारतातून फायदा कमवत आहेत. परंतू, इथल्या सरकारच्या निर्देशनांचे पालन करण्यासाठी विदेशातील कार्यालयांकडून निर्देश येण्याची वाट पाहतात. (हेही वाचा, WhatsApp लवकरच सादर करेल खास फिचर; मोबाईल शिवाय Desktop वर करता येईल लॉगइन)

दरम्यान, कंपन्यांना सरकारकडून देण्यात आलेल्या नियमांचे आणि आदेशांचे पालन करावे लागणार आहे. त्यासाठी कंपन्यांना त्यांचा पत्ता, कार्यायलय भारतात ठेवावे लागणार आहे. तक्रारींचे निरसन करण्याठी, आक्षेपार्ह मजकूर, आशय हटविण्यासाठी तसेच इतर अनेक गोष्टांसाठी स्वतंत्र यंत्रणा उबारावी लागणार आहे. त्यासाठी नव्या नियमांनुसार एका समिती स्थापना करण्यात येणार आहे. ज्यात डिफेंस, एक्सटर्नल अफेयर्स, गृह मंत्रालय, माहिती प्रसारण मंत्रालय, कायदा, आयटी, आणि महिला व पालविकासंत्रालयांचाही समावेश आहे कंपन्यांना हे नियम पाळावे लागतील अन्यथा कारवाईला सामोरे जाव लागू शकते. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये नेमके काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.