रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म मध्ये अमेरिकन Vista Equity Partners ची गुंतवणूक; 11,367 कोटी रूपयांचा व्यवहार

सुमारे 11,367 कोटी रूपयांचा व्यवहार आणि 2.32 टक्के हिस्सेदारी.

Mukesh Ambani | Reliance Jio | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

खाजगी अमेरिकन इक्विटी फर्म व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स (Vista Equity Partners) ने रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 2.32 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. हा व्यवहार सुमारे 11,367 कोटी रूपयांचा असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान मागील दोन आठवड्यात जिओ प्लॅटफॉर्मचा हा तिसरा बडा करार आहे. त्यामुळे आता जिओ प्लॅटफॉर्म्सची इक्विटी व्हॅल्यू 4.91 लाख कोटी रुपये तर एंटरप्राइज व्हॅल्यू 5.16 लाख कोटी इतकी झाली आहे. आज (8 मे) याची माहिती रिलायंसकडून एक परिपत्रक जारी करून देण्यात आली आहे. Reliance-Facebook Deal: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्सने फेसबुक आणि विविध कंपन्यांसोबत आतापर्यंत केलेले महत्त्वाचे व्यवहार.

मागील 2-3 आठवड्यांचा आढावा घेतल्यास सुरूवातीला मुकेश अंबानी यांनी फेसबूक सोबत करार करत 10% शेअर्स म्हणजे $5.7 बिलियनचा व्यवहार केला. त्यापाठोपाठ मागील आठवड्याच्या सुरूवातीला सिल्व्हर लेक पार्टनर्स सोबत जिओने व्यवहार केला. यामध्ये 1% हिस्सेदारीसाठी 5,656 कोटी रूपयांचा करार झाला आहे.

रिलायंस कंपनी कडून देण्यात आलेली माहिती

भारतामध्ये विस्टा कडून करण्यात आलेली ही पहिलीच गुंतवणूक आहे. विस्टा त्यांच्या सुरूवातीच्या टप्प्यांमध्ये टेक्निकल कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यामध्ये एक ट्रॅक रेकॉर्ड करणारी कंपनी आहे. त्यांचा मागील 10 वर्षांमधील गुंतवणूक प्रॉफिटेबल राहिली आहे. आता भारतामध्ये रिलायंस सोबत ही कंपनी कसा व्यवहार करते हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

2016 मध्ये जिओची निर्मिती केल्यानंतर रिलायंस देशातील एकमेव अशी कंपनी आहे जी भारतीय बाजारात अमेरिकी कंपन्यांसोबत प्रतिस्पर्धा करण्यात सक्षम आहे. रिलायंसने मोबाईल टेलिकॉम सोबत होम ब्रॉडबॅन्ड ते अगदी ई कॉमर्समध्येही विस्तार केला आहे.