देशभरातील आबाल वृद्धांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या टिक टॉकच्या बॅन (Tik Tok Ban) ला बऱ्याच चाहत्यांकडून निषेध नोंदवण्यात येत होता. 18 एप्रिल पासून मद्रास कोर्टाच्या (Madras High Court) मागणीने टिक टॉक च्या वापरावर अंतरिम बंदी (Interim Ban) आणण्यात आली होती. मात्र मद्रास हाय कोर्टाकडून या संदर्भात कोणतीही ठोस पाऊलं उचलण्यात होणारी दिरंगाई बघता सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आता मद्रास हाय कोर्टालाच लवकर निर्णय घेण्याची तंबी दिल्याचे समोर येत आहे. यानुसार मद्रास हाय कोर्टाने 24 एप्रिल पर्यंत या अंतरिम बंदीवर ठोस निर्णय घेतला नाही तर टिक टॉक वरील बॅन तातडीने हटवण्यात येईल असा अल्टिमेटम सुप्रीम कोर्टाने घोषित केला आहे.
या पूर्वी टिक टॉकच्या वापरामुळे भारतातील लहान मुलांच्या मानसिकतेसावर वाईट परिणाम होत आहे तसेच या ऍप वर पोस्ट होणाऱ्या व्हिडियोजमुळे पोर्नोग्राफीला प्रोत्साहन मिळत आहे, असा आरोप मद्रास कोर्टाने केले होता ज्यामुळे टिक टॉकवर अंतरिम बंदी आणण्यात आली होती. गुगल आणि अॅपल कंपनीला TikTok अॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश
या बंदी मुळे टिक टॉकची निर्मिती करणाऱ्या बाईट डान्स (Byte Dance) या कंपनीला करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मात्र या संदर्भात तज्ञांची माहिती घेत योग्य तो खटला पार पडल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही असा आदेश अभिषेक मनू सिंघवींच्या कौन्सिलतर्फे देण्यात आला. या विधानानंतर कोर्टाच्या कामात विनाकारण वेळ काढला जाऊ नये याची दक्षता घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिल्याचे सांगण्यात येते.
टिक टॉक च्या बंदीचे पालन करत हा ऍप गूगल च्या प्ले स्टोअर व ऍप स्टोअर वरून तूर्तास हटवण्यात आला आहे.