सावधान! मोबाईल वर बोलणं आता पडणार महागात; Tariff मध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, टेलिकॉम कंपन्या मोबाईल टॅरिफमध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Vodafone-Idea And Airtel | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

सगळ्यांच्या हातातलं खेळणं बनलेल्या आणि ज्याच्यावर सर्वांच्या दिवसाचा दिनक्रम अवलंबून असतो त्या मोबाईलवर बोलणं आता महागणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, टेलिकॉम कंपन्या मोबाईल टॅरिफमध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपन्यांच्या सरासरी महसूलाच्या आढाव्यानुसार युजर्समध्ये जास्त वाढ झाली नसल्याचं समोर आलं आहे.भारतातल्या टेलिकॉम सर्व्हिसेस सब्स्क्रायबर्सचा एकूण खर्च इतर देशांच्या तुलनेत फारच कमी आहे. व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेलला एकूण कमाईच्या स्वरुपात असलेली थकबाकी भरावी लागणार आहे.

व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल या कंपन्यांना आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी टॅरिफमध्ये वाढ करावीच लागणार आहे. त्याचबरोबर जर असं न केल्यास व्होडाफोन आणि आयडियाच्या अडचणीत वाढ होणार असून कदाचित या कंपन्यांना लवकरच भारतातून निरोप घ्यावा लागणार आहे. Reliance Jio ने हटवला 49 रुपयांचा प्लॅन आता ₹75 पासून रिजार्च उपलब्ध

टेलिकॉम कंपन्या या वर्षी टॅरिफमध्ये 30% पर्यंत वाढ करु शकतात. भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि रिलायन्स जिओने गेल्या वर्षाच्या शेवटी प्रीपेड टॅरिफमध्ये 14 ते 33 टक्के वाढ केली. मागील 3 वर्षातून पहिल्यांदाच ही वाढ झाली आहे.

महिन्याभरापूर्वी मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनीच्या जिओने त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये 40 टक्क्यांनी वाढ केली आहे. परंतु जिओचे असे काही प्लॅन आहेत त्यांची किंमत 25 टक्क्यांनी स्वस्त आहेत. जिओचे नवे टॅरिफ प्लॅन 6 डिसेंबर पासून लागू झाले आहेत.