Surya Grahan 2022 Date and Timings: 25 ऑक्टोबर दिवशी सूर्यग्रहण; भारतात कधी दिसणार ग्रहण, वेध पाळण्याचा कालावधी काय? घ्या जाणून

पण ग्रहण संपण्याआधीच संध्याकाळी 6.08 ला सूर्यास्त होणार आहे. त्यामुळे ग्रहणातच सूर्यास्त होताना पहायला मिळणार आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये दिसणारं यंदाच्या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan) 25 ऑक्टोबर दिवशी आहे. जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून  सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होते.  दिवाळी सणामध्ये यंदाचं खंडग्रास सूर्यग्रहण येणार असल्याने अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. हे खंडग्रास सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर दिवशी भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, यूरोप आणि आफ्रिका खंडामध्ये पाहता येणार आहे. अवकाशातील घडामोडींचं कौतुक असणार्‍यांना ही पर्वणी असणार आहे कारण हे ग्रहण त्यांना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता येणार आहे. मात्र त्यासाठी थोडी काळजी घ्यावी लागणार आहे.

प्रसिद्ध पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत हे ग्रहण संध्याकाळी 4.49 वाजता सुरू होईल. पण ग्रहण संपण्याआधीच संध्याकाळी 6.08 ला सूर्यास्त होणार आहे. त्यामुळे ग्रहणातच सूर्यास्त होताना पहायला मिळणार आहे.

सूर्यग्रहणाच्या वेळा

पुणे - ग्रहणास सुरूवात (4.51 वाजता) सूर्यास्त (6.31 वाजता)

नाशिक - ग्रहणास सुरूवात (4.47 वाजता) सूर्यास्त (6.31 वाजता)

नागपूर - ग्रहणास सुरूवात (4.49 वाजता) सूर्यास्त (6.29 वाजता)

औरंगाबाद - ग्रहणास सुरूवात (4.49 वाजता) सूर्यास्त (6.30 वाजता)

कोल्हापूर - ग्रहणास सुरूवात (4.57 वाजता) सूर्यास्त (6.05 वाजता)

सूर्य ग्रहणामध्ये सूतककाळ हा सूर्यग्रहणापूर्वी 12 तास आधी सुरू होतो.होतो. ग्रहणामध्ये वेध हे पहाटे 3.30 पासून संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत असणार आहेत. लहान मुलं, गर्भवती स्त्रिया, अशक्त व्यक्ती यांच्यासाठी वेध दुपारी 12.30 पासून सुरू होणार आहेत. ग्रहण काळामध्ये अन्न शिजवू नये, जेऊ नये, धार्मिक विधी टाळावेत. देव दर्शन देखील बंद ठेवलं जातंं. अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे ग्रहणानंतर सारं घरं स्वच्छ करून पुन्हा आंघोळ करून कामाला सुरूवात केली जाते.

टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली पुष्टी करत नाही. अंधश्रद्धा पसवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.